शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राहात्याच्या मंडळाधिकाऱ्याने केलं असं काही की त्याचा सर्वसामान्यांना होतोय मोठा फायदा

महसूली ज्ञानाचा खजिना ब्लॉगच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुला..!

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 11, 2022 | 5:12 am
in राज्य
0
IMG 20221010 WA0019

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुसते कार्यालयीन काम न करता आपल्या ज्ञानाचा, आपल्याकडील माहितीचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. यासाठी अविश्रांत मेहनत घेऊन राहाता मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी ‘महसूल मित्र’ नावाचा ब्लॉग तयार केला. या ब्लॉगवरील महसूली नियम, कायदे, प्रशासन, निवडणूक, शासकीय परिपत्रके या विषयींचे लेख व पुस्तकांच्या माध्यमातून माहितीचा खजिनाच सर्वसामान्य लोकांसाठी मोफत खुला झाला आहे. १ जुलै २०१५ रोजी सुरू केलेल्या या ब्लॉगवर आजअखेर १२ लाख ८१ हजार वाचकांनी भेटी दिल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्लॉगवरील माहितीचे कौतुक केले आहे.

साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांनी सुरू केलेल्या ब्लॉगची प्रेरणा घेऊन डॉ.शेख यांनी स्वत:चा ‘महसुल मित्र मोहसिन शेख’ नावाचा mohsin7-12.blogspot.com हा ब्लॉग सुरू केला. मागील सात वर्षात या ब्लॉगने उत्तुंग भरारी घेतली असून साडे बारा लाख प्रेक्षक संख्येचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे चारही खंड या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. ‘महसूल वाचनालय’ या विभागात डॉ.मोहसिन यांनी स्वत: संकलित व संपादित केलेल्या विविध विषयांची ५० पुस्तके उपलब्ध आहेत. आस्थापना विषयक विविध नियम व तसेच अर्जांचे नमूने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गौणखनिज, पुरवठा व निवडणुक विभागातील महत्त्वपूर्ण माहिती, परिपत्रके यांच्या नोंदी ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

शासकीय प्रकाशन-पुस्तके या विभागात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६८ पासून ते भारतीय वारसा अधिनियम १९९५ पर्यंतच्या महत्त्वपूर्ण २४ कायदे/नियम अपलोड करण्यात आले आहेत. वाचकाला कंटाळा येऊ नये. यासाठी ब्लॉगवर विविध प्रसिध्द ब्लॉग, वृत्तपत्रे, चालू घडामोडी व शासकीय संकेतस्थळांच्या लिंक देण्यात येऊन माहितीत रंजकता आणण्यात आली आहे.

ब्लॉगवर महसूल प्रश्नोत्तरे, जाणून घ्या महसूल संलग्न कायदे, महसूल न्यायालय, जनमाहिती अधिकारी, चला गोष्टीतून फेरफार शिकुया, तलाठी कामकाज मार्गदर्शिका, महसूल तालुकास्तरीय समित्या रचना व कार्य, १0१ महसूली लेख व ऑनलाईन ७/१२, ही पुस्तके साध्या व सोप्या भाषेत असल्यामुळे जास्त लोकांनी डाऊनलोड केली आहेत. ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या ई-पुस्तकांची छपाई करून नागरिकांना मोफत वितरण करण्याचे उपक्रम अनेक सेवाभावी संस्थामार्फत राबविण्यात आला आहे.
भारताबरोबरच अमेरिका, रशिया, तुर्केमेनिस्तान, नेंदरलँड, इंडिनोशिया, संयुक्त अरब आमिराती व जर्मनी आदी देश-विदेशातील वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या आहेत.

ब्लॉगसोबत डॉ.मोहसिन शेख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आजपर्यंत तीन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या लोकप्रिय ब्लॉग https://maharashtracivilservice.org वर सुध्दा ‘महसुलमित्र’ ब्लॉगची लिंक देण्यात आली आहे. ब्लॉग पूर्णपणे मराठीत तयार केल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गापर्यंत सहजच पोहचला आहे. ब्लॉगवरील माहिती उत्कृष्ट व संग्राह्य आहे. अशा प्रतिक्रिया वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांनी दिल्या आहेत.

महसुल मित्राच्या उपक्रमाबाबत डॉ.मोहसिन शेख म्हणाले, ‘‘सर्वसामान्य लोकांना महसूलविषयक नियम व कायद्यांची माहिती साध्या व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावी. या उद्देशाने ब्लॉग सुरू केला. कार्यालयीन कामातून वेळ काढून माहिती संकलित करण्याचे काम केले. यासाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळालं म्हणून ही माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहचवू शकलो. महसूल वाचनालय मध्ये सध्या ७० पुस्तके व लेख उपलब्ध असून येत्या १५ दिवसात ही संख्या ३०० पेक्षा जास्त केली जाईल. तसेच पुढील काळात युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून महसूल विषयक माहिती साध्या व सोप्या भाषेत लोकांपर्यत पोहचविण्याचा मनोदय आहे.’’ राहाता तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, महसुलमित्र ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना समजण्यास अवघड असलेले कायदे व नियम सहज भाषेतून मांडण्याचे काम डॉ.मोहसिन यांनी केले आहे. पारंपरिक माहितीत नावीन्यता आणल्यामुळे ब्लॉग वाचनीय झाला आहे.

Rahata Circle Officer Blog Common Man Benefit

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ड्रोनद्वारे औषध फवारणी… क्षणात कळेल जनावराचा आजार… मिळणार विविध अलर्ट्स… 5Gमुळे शेतीत होणार अमुलाग्र बदल

Next Post

रॉकीची रीना परतणार? केजीएफ ३ बद्दल श्रीनिधी म्हणाली…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Srinidhi Shetty e1665407868226

रॉकीची रीना परतणार? केजीएफ ३ बद्दल श्रीनिधी म्हणाली...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011