गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राफेल डीलमध्ये नाव आलेला मध्यस्थ सुशेन गुप्ता आहे तरी कोण?

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 2:22 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
sushen gupta

नवी दिल्ली – राफेल या लढाऊ विमानाच्या सौद्यात दलाली मिळाल्याच्या आरोपाने भारत आणि फ्रांसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला आहे. राफेल डील करण्यासाठी फ्रांसची हवाई वाहतूक कंपनी दसॉने मध्यस्थाला (दलाल) ७.५ लाख युरो इतकी दलाली दिली होती, असा दावा फ्रांसमधील मीडियापार्ट या माध्यम संस्थेच्या वृत्तात करण्यात आला आहे. ही रक्कम बनावट कंपन्या आणि खोट्या बिलांच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली होती, असाही दावा करण्यात आला आहे.

या डीलमध्ये सुशेन मोहन गुप्ता या दलालाचे नाव समोर आले आहे. या आरोपांनी भारतातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. भाजपने या प्रकरणाची चौकशी केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर यूपीए सरकारच्या काळातच संगनमत करून सुशेन मोहन गुप्ताने हे काम केले आहे, असा प्रत्यारोप भाजपने केला आहे.

४६ वर्षीय व्यावसायिक सुशेन मोहन गुप्ता यांचे नाव भारतातील संरक्षण आणि हवाई वाहतूक क्षेत्रांशी निगडित असून त्यांचे कुटुंब याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. जुनी दिल्ली येथे स्थायिक झालेल्या गुप्ता कुटुंबीयांचा कपड्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. परंतु सुशेन यांचे आजोबा बृजमोहन गुप्ता यांनी हवाई वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले. गुप्ता यांनी अनेक संरक्षण आणि हवाई वाहतूक कंपन्यांसोबच्या आंतरराष्ट्रीय करारात महत्त्वाची भूमिका निभावली होती. ब्रिटिश कंपनी वेस्टलँड एअरक्राफ्ट्स, प्रॅट अँड विटनी सह अनेक दिग्गज कंपन्यांसोबत गुप्ता यांनी डील करून दिली होती. बृजमोहन गुप्ता यांच्यानंतर त्यांचा मुलगा देव यांनी कौटुंबिक व्यवसाय म्हणून हाच व्यवसाय सुरू ठेवला. सुशेन मोहन गुप्ता यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी या क्षेत्रात आहे.

दिल्ली येथील अमेरिकन दूतावास शाळेत शिकलेल्या सुशेन मोहन गुप्ता यांनी अमेरिकेतच उच्च शिक्षण घेतले. सुशेन यांनी कुटुंबाच्या हवाई वाहतूक व्यवसायासह आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि ऊर्जा व्यवसायातही काम सुरू केले होते. सुशेन गुप्ता यांचे नाव २०१० रोजी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हेलिकॉप्टर घोटाळ्यादरम्यान समोर आले होते. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत त्यांनी ही डील गौतम खेतान आणि व्यावसायिक राजीव सक्सेना यांच्यासोबत करून दिली होती. गौतम खेतान यांचे वडील ओ. पी. खेतान यांचे गुप्ता कुटुंबीयांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. गुप्ता कुटुंबीयांचे वकील म्हणूनही त्यांनी काम केले होते.

ओ. पी. खेतान यांच्यामुळेच गुप्ता यांची राजीव सक्सेना यांच्याशी ओळख झाली होती. ऑगस्टा वेस्टलँड डीलच्या तपासादरम्यान तिघांना अटक करण्यात आली होती. दिल्लीतील न्यायालयाने सुशेन गुप्ता यांना जामीन मंजूर केला होता. सुशेन गुप्ता यांनी अनेक देशात पसरलेल्या आपल्या बनावट कंपन्यांच्या जाळ्याद्वारे डीलमधील पैसे घेतले होते, असा दावा मीडियापार्टकडून करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता? कोविड लस घेणारी महिला रातोरात कोट्यधीश! पण, कसं काय?

Next Post

ST संपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल; म्हणाले…..

India Darpan

Next Post
cm meeting 1 1140x570 1

ST संपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल; म्हणाले.....

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011