नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नाशिक व्दारा दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडू , क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या करीता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. हे पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र , स्मृतिचिन्ह , रोख रुपये १० हजार असे आहे . यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी १५ , गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी १ व दिव्यांग खेळाडू पुरस्कारासाठी २ असे एकूण १८ अर्ज प्राप्त झालेले आहेत . सदरच्या अर्जांची जिल्हा क्रीडा पुरस्कार छाननी समिती मार्फत छाननी करण्यात आली असून एक पुरूष खेळाडू , एक महिला खेळाडू , एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कारार्थींना २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी छगन भुजबळ , पालकमंत्री , नाशिक यांच्या शुभहस्ते पालकमंत्री , नाशिक यांचे निवासस्थान भुजबळ फार्म , नाशिक येथे एका छोटेखानी समारंभात गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक , तालुका क्रीडा अधिकारी संजिवनी जाधव , क्रीडा अधिकारी महेश पाटील , प्रकाश पवार , अविनाश टिळे व संदीप ढाकणे , माजी आमदार जयवंत जाधव तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी ऊपस्थित होते.