शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी कृषीमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

एप्रिल 29, 2023 | 5:18 am
in राज्य
0
1140x570 14

 

अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासन हे शेतकऱ्यांना आणि कृषीक्षेत्राला पाठबळ देत आहे. त्यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आताही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ या मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटन श्री.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या समारंभाला कुलगुरु डॉ. शरद गडाख, विधानसभा तथा कार्यकारी परिषदचे सदस्य आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, श्रीमती हेमलता अंधारे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी संचालक डॉ. श्यामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. फीत कापून वसतिगृहाच्या सुसज्ज इमारतीचे उदघाट्न करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण झाले.

शासनाच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मदत
श्री. सत्तार म्हणाले की, विद्यापीठ म्हणजे भावी पिढी घडविण्याचे केंद्र होय.अशा या केंद्राला सर्व सुविधा देऊन सुसज्ज करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला पाठबळ दिले आहे. एक रुपयात पीक विमा, शेतकरी सन्मान योजनेत केंद्रा प्रमाणे योगदान, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेत केलेली सुधारणा यामुळे शेतकऱ्यांना मोलाची मदत होत आहे. सध्या राज्यात गारपिटीचे आणि अवकाळी पावसाचे संकट आहे. अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

वसतिगृहांसाठी प्रस्ताव पाठवा
ते पुढे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यापुढे वसतिगृहात जागा नाही म्हणून एकही विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेर राहणार नाही. त्यांना विद्यापीठाच्या आवारात वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.

बोंडअळी निर्मूलनासाठी पेरणी कालावधीबाबत उपाययोजना
कपाशी वरील बोंडअळी निर्मूलन करण्यासाठी कापूस बियाणे पेरणीचा कालावधी निश्चित करण्याबाबत शासनस्तरावर उपाययोजना करू, असेही त्यांनी सांगितले. राज्यशासनाने प्राथमिक शिक्षणापासुन कृषी हा विषय अभ्यासक्रमात घ्यावयाचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करतांना कृषी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. सत्तार यांनी विद्यार्थीनी व विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

कपाशी बियाणे पाकिटासोबत फेरोमेन सापळे द्या- आ. सावरकर
आ. रणधीर सावरकर यांनी सातत्याने होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले. हरभरा खरेदीसाठी मर्यादा वाढवून दिल्याबद्दलही आभार मानले. कपाशी वरील बोंड अळी निर्मूलनासाठी कपाशी पेरणी कालावधी निश्चित करावा, तसेच कपाशी बियाण्याच्या पाकिटासोबत फेरोमेन सापळे विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली.

कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध कामगिरीबद्दल माहिती दिली. तसेच विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. श्यामसुंदर माने यांनी तर सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले. तर डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वसतिगृहाची वैशिष्ट्ये
एकूण १४२३.६२ चौ. मी. बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या या वसतिगृहाची इमारत दुमजली आहे. तळमजल्यावर २६ तर पहिल्या मजल्यावर १३खोल्या अशा एकूण ३९खोल्या आहेत. या इमारतीत एकूण ७९ मुलांच्या राहण्याची व्यवस्था असून तळमजल्यावर कार्यालय, अतिथीकक्ष, भोजनालय आदी सुविधा असून भांडार गृह, स्वछता गृह आदी सुविधा अद्यावत आहेत.

Punjabrao Deshmukh Agri University Student Hostel

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मांजरी रेल्वे उड्डाणपुलाबाबत बांधकाम मंत्र्यांनी दिले हे निर्देश

Next Post

विमानात प्रवासी आले… पण पायलटच गायब! तब्बल ८ तास चालला गोंधळ… नंतर काय झालं

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमानात प्रवासी आले… पण पायलटच गायब! तब्बल ८ तास चालला गोंधळ... नंतर काय झालं

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011