पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे शहराच्या हद्दीत प्रशिक्षणार्थी विमानाचे क्रॅश लँडिंग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. या दुर्घटनेत २२ वर्षीय महिला पायलट भाविका राठोड जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी ११.३० वाजता झाला. भाविका राठोड प्रशिक्षणासाठी छोट्या विमानाने जात असताना ही घटना घडली.
यावेळी त्यांचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात इमर्जन्सी लँडिंग केले. या अपघातात भाविका राठोड जखमी झाली आहे. तिला शेलगाव येथील नवजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त विमान रेडबर्ड एव्हिएशनचे असून ते बारामती, पुणे येथे आहे. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
https://twitter.com/naidusudhakar/status/1551478599311446017?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
Pune Trainee Aircraft Crash Pilot Injured