पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाच घेताना पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लाच घेणे पुणे शहरातील दोघा वाहतूक पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत पोलीस विभागाने तपासाअंती या दोघा पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी ते शेअर देखील केले आहेत. याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे वाईट हेतूला आळा बसवू शकतो, असे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
पुणे शहरात वाहनचालकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बाळू येडे आणि गौरव उभे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे कर्मचारी स्वारगेट वाहतूक विभागात कार्यरत होते. या संदर्भात प्रफुल्ल सारडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गंगाधाम-आई माता मंदिर रस्ता या ठिकाणी वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान व्हिडीओमध्ये वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे स्वीकारतानाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. विभागीय चौकशीतील कार्यवाही नुसार या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी थेट लाच घेतल्याचे स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिसांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या अनेक नागरिक सजग झाले आहेत. असे वाईट कृत्य दिसल्यास ते थेट सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. या सोशल मीडियामुळे आतापर्यंत अनेक अशा घटना पुढे आल्या आहेत आणि वेळीच संबंधित व्यक्तींवर कारवाईदेखील झाली आहे. आता पुन्हा एकदा पुणे शहरात पोलिसांकडून लाचखोरीचे प्रकरण घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
https://twitter.com/shivanipandhar1/status/1659076121596669958?s=20
Pune Traffic Police Video Viral Suspension