बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदणी चौक उदघाटनावेळी पुणे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर… मेधा कुलकर्णींनी अखेर मन मोकळं केलंच…

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 10:21 pm
in राष्ट्रीय
0
F3N5hSxaoAAQXlr e1691770572285

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदणी चौकचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपच्या माजी आमादार मेधा कुलकर्णी यांनी थेट आपली नाराजीची पोस्ट ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना पुण्यातील कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांना अनेक संधींसाठी भाजपकडून डावलण्यात आले. पण, त्यांनी पहिल्यांदा अशी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे…. माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही. पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी?

स्वतः गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा प्रश्न विचारला आहे.

मध्यंतरी मोदी, अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घेऊन निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असेही मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

"Disappointed"
.
.#BJPKothrud #BjpPune pic.twitter.com/UEIV1lV40w

— Dr. Medha Kulkarni (Modi Ka Parivar) (@Medha_kulkarni) August 11, 2023

Pune Politics BJP medha kulkarni conflict Chandani Chowk Flyover

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज होईल मोठा लाभ… जाणून घ्या, शनिवार, १२ ऑगस्ट २०२३चे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

India Darpan

Next Post
Vichar Dhan

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011