पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याने या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनआयए, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्ध हे आंदोलन करण्यात आले. मोठमोठ्याने घोषणा देण्यासह रस्ताही अडवून धरला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. शिवाय, येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करुन त्यांना नाहक त्रास देण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनांकडेदेखील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय २६, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि १४१, १४३, १४५, १४७, १४९, १८८, ३४१ सह मपोका ३७ / १ / ३सह १३५नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस हवालदार नवनाथ डांगे यांनी याविषयी तक्रार दिली आहे. बंड गार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
https://twitter.com/praveenmishramj/status/1573568182174253056?s=20&t=ppJg7bGJxrF8d9gP7ywwPA
Pune PFI Activist Agitation Pakistan Zindabad Slogan FIR Arrest
Crime Terrorism
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/