शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यातील नवले ब्रीज अपघात प्रकरणी समोर आली मोठी अपडेट; आज तातडीने होणार ही बैठक

by India Darpan
नोव्हेंबर 21, 2022 | 1:04 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FiBNIT1aAAEa9UR

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवले ब्रीजवरच्या अपघाताने पुणेकरांना सुन्न केले आहे. ब्रीजवरून उतरताना एकानंतर एक अशा ४८ वाहनांना ट्रकने धडका दिल्याची घटना रविवारी घडली. आता याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली असून या अपघाताप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्यातील मुंबई- बंगळुरू हायवेवर नवले ब्रीजवर ही घटना घडली. आंध्र प्रदेशची पासिंग असलेला ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रीज परिसरात दरी पूल ओलांडल्यानंतर ट्रकचं नियंत्रण सुटलं. ब्रीजच्या उतारावरून एकानंतर एक असंख्य वाहनांना धडका देत ट्रक पुढे निघाला. या घटनेत जवळपास ४८ वाहनांना मोठं नुकसान झालं तर १० जण जखमी झाले आहेत.

सातऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकची पासिंग आंध्र प्रदेशची होती. मनीलाल यादव, असे ट्रक चालकाचे नाव असल्याचे पोलिसांच्या माहितीत उघड झाले आहे. हा ट्रक चालक मध्य प्रदेशचा आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना घडताच काही वेळातच अपघात स्थळी बचावकार्य सुरु झाले. ट्रॅफिक जाम असल्यामुळे अनेक वाहने एकमेकांना खेटून उभी होती. यामुळे अनेक वाहनांमध्ये लोक आणि चालक अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांसमोर अपघातग्रस्त वाहनांतून चालकांना बाहेर काढण्याचंदेखील आव्हान उभं राहिलं होतं. सोमवारी सकाळपर्यंत अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सारण्याचं काम सुरु होतं.

आज महत्त्वाची बैठक
सध्या नवले ब्रीजवरील ही वाहने बाजूला काढण्यात आली असून आता हा ब्रीज वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका का झाला, यासंबंधी महत्त्वाची बैठक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (न्हाई) तर्फे आज सोमवारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत वाहतूक कोंडी, पर्याय, अपघात आदींवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Pune Nawale Bridge Road Accident Today Important Meet

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राहुल गांधींनी केला संजय राऊत यांना फोन; काय झाली चर्चा?

Next Post

महात्मा गांधींचे पणतू तुषार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केला हा अतिशय गंभीर आरोप

India Darpan

Next Post
Tushar Gandhi e1669017023420

महात्मा गांधींचे पणतू तुषार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केला हा अतिशय गंभीर आरोप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011