India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुण्यात आता तुमचे घर होणारच! म्हाडाचे तब्बल ३१२० फ्लॅट उपलब्ध; ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ

India Darpan by India Darpan
March 20, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३ हजार १२० सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने – पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच निवारा आवश्यक आहे. रोजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करीत लवकरात लवकर घरांच्या सोडती काढाव्यात.

पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६ हजार ५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील २ हजार ९३८ सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. ३ हजार १२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले.

एकूण सदनिका – ६,०५८
एकूण प्राप्त अर्ज – ५८,४६७
म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका- २,९३८
२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना – २,४८३
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) – ६३७
एकूण सदनिका – ३,१२०
एकूण प्राप्त अर्ज – ५५,८४५

बुकींगसाठी संपर्क
https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/

Pune Mhada 3120 Flat online lottery Started


Previous Post

चला, तयारीला लागा! राज्यात २ हजार प्राध्यापकांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू

Next Post

साताऱ्यात माजी नगरसेवकाच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू; ही काय मोगलाई आहे का? विधिमंडळात गाजला प्रश्न

Next Post
प्रातिनिधीक फोटो

साताऱ्यात माजी नगरसेवकाच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू; ही काय मोगलाई आहे का? विधिमंडळात गाजला प्रश्न

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group