पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याला हादरवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील दौंड येथील हा प्रकार आहे. डॉक्टर पतीने टोकाचे पाऊल उचलत आपले संपूर्ण कुटुंबच संपवले आहे. सर्वप्रथम शिक्षिका असलेल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना त्याने विहीरीत ढकलले. आणि सुसाईड नोट लिहून या डॉक्टरने स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे दौंड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निराशा आणि घरगुती कलह एक घर तसेच कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील वृत्ताने सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पत्नीच्या भांडणातून डॉक्टर व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आहे. त्याने स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यातील वरवंड भागात ही घटना घडली आहे. या घटनेत एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अतुल दिवेकर (वय ४२ वर्ष, डॉक्टर व पती), पल्लवी दिवेकर (वय ३९ वर्ष, शिक्षिका व पत्नी), अद्वैत (वय ९ वर्ष, मुलगा) आणि वेदांती (वय ६ वर्ष, मुलगी) अशी मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टर अतुल यांनी सर्वप्रथम घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलांना बाहेर नेऊन त्यांना विहीरीत ढकलले. पोलिसांनी सांगितले की, पत्नीही हत्या आणि मुलांना विहीरीत फेकून दिल्यानंतर अतुल घरी परतला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी हे जोडपे लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथे एक सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये अतुलने पत्नी पल्लवीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.