मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिक्षिका पत्नीचा आधी गळा दाबला… नंतर दोन्ही मुलांना विहीरीत ढकलले… डॉक्टर पतीने मग…. दौंडमध्ये नेमकं काय घडलं?

by India Darpan
जून 21, 2023 | 12:04 pm
in संमिश्र वार्ता
0
Capture 18

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याला हादरवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील दौंड येथील हा प्रकार आहे. डॉक्टर पतीने टोकाचे पाऊल उचलत आपले संपूर्ण कुटुंबच संपवले आहे. सर्वप्रथम शिक्षिका असलेल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना त्याने विहीरीत ढकलले. आणि सुसाईड नोट लिहून या डॉक्टरने स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे दौंड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निराशा आणि घरगुती कलह एक घर तसेच कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील वृत्ताने सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पत्नीच्या भांडणातून डॉक्टर व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आहे. त्याने स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यातील वरवंड भागात ही घटना घडली आहे. या घटनेत एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अतुल दिवेकर (वय ४२ वर्ष, डॉक्टर व पती), पल्लवी दिवेकर (वय ३९ वर्ष, शिक्षिका व पत्नी), अद्वैत (वय ९ वर्ष, मुलगा) आणि वेदांती (वय ६ वर्ष, मुलगी) अशी मृतांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टर अतुल यांनी सर्वप्रथम घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलांना बाहेर नेऊन त्यांना विहीरीत ढकलले. पोलिसांनी सांगितले की, पत्नीही हत्या आणि मुलांना विहीरीत फेकून दिल्यानंतर अतुल घरी परतला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी हे जोडपे लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथे एक सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये अतुलने पत्नी पल्लवीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत ईडीकडून छापेमारी… १५हून अधिक ठिकाणे… कुणावर आणि का?

Next Post

चक्क कडुनिंबाच्या झाडावर सूर्यनमस्कारासह तब्बल अर्धा तास ५१ योगासने… नांदगावच्या योगशिक्षकाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

Next Post
20230621 113843

चक्क कडुनिंबाच्या झाडावर सूर्यनमस्कारासह तब्बल अर्धा तास ५१ योगासने... नांदगावच्या योगशिक्षकाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011