पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथे आठ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वानवडी भागात स्कुल बस ड्रायव्हरने या आठ वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार केले. बदलापूर, अकोल्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ४५ वर्षाच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक केली आहे. ३० सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायव्हर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यानंतर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षाच्या दोन पीडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमध्ये बोलावले. त्यानंतर त्याने अश्लिलचाळे केले.
या प्रकारानंतर एका पीडित मुलीने याबाबत पालकांना माहिती दिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन ड्रायव्हरला अटक केली. नियमानुसास प्रत्येक बसमध्ये महिला केअर टेकर असणे बंधनकारक आहे. या घटनेच्या वेळी महिला टेक केअर बसमध्ये होती का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.