.
पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक पती दारू पिऊन आपल्या पत्नीला त्रास देत असतात, परंतु अनेक महिला हा सर्व त्रास निमूटपणे सहन करतात, मात्र अति त्रासाने काही वेळा अशा महिला टोकाचे पाऊल देखील उचलतात. तसेच सध्याच्या काळात विवाहित स्त्री पुरुषांचे अनैतिक संबंध देखील वाढले आहेत. त्यातूनच गुन्हेगारीच्या घटना घडतात आजच्या काळात विवाहित स्त्री पुरुषांच्या अनैतिक संबंधांमध्ये देखील वाढ झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अनैतिक संबंध तसेच प्रेमप्रकरणातून घडत आहे. अशीच एक घटना पुण्यातील दौंड तालुक्यात घडली आहे.
एका महिलेचा पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. आणखी वाईट गोष्ट म्हणजे या महिलेने स्वतःच पोलिसांत धाव घेऊन पती हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करताच महिलेचा प्रताप उघडकीस आला. कारण यातील भयानक गोष्ट म्हणजे या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. यात शीतल जगताप आणि अतुल चौगुले, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शीतल ही तिला सुनील नाव असलेल्या आपल्या पतीसह पुण्यातील भांडगाव परिसरात राहायला होती. तिचे अतुल प्रभाकर चौगुले या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना उडथळा ठरत असलेल्या पतीची झोपत असताना डोक्यात दगड घातून हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. आरोपी महिलेचा पती दारू पिऊन मारहाण करायचा. याच त्रासाला वैतागून या महिलने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर आरोपी महिलेने दोन दिवसांनंतर पती बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असता. दुसऱ्याच दिवशी सुनीलचा मृतदेह घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याने पोलिसांनी याबाबत संशय व्यक्त करीत अधिक तपास सुरू केला असता या चौकशीत शीतलने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. तर रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. मात्र आता या घटनेबाबत चांगली चर्चा सुरू आहे.
Pune Crime Husband Wife Police Investigation