India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संतापजनक! विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार… तब्बल ६ तास अत्याचार… ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

India Darpan by India Darpan
May 20, 2023
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार गेल्या सात वर्षापासून सुरु होता. वास्तविक महिला व मुलींच्या संरक्षणासाठी सध्या कायदे बळकट करण्यात आले आहे. मात्र तरी देखील बीड जिल्ह्यातील स्त्रियांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस स्त्रियांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार उघड होत आहेत. गेल्या काही महिन्याभरापासून बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.

एका रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका रिक्षाचालकाने तिच्यावर अत्याचार करत त्याचा व्हिडीओ तयार केला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी तिच्यावर सन २०१४ ते २०२१अशी सात वर्षे आळीपाळीने अत्याचार केला. मात्र त्यानंतर आता पुन्हा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने हतबल झालेल्या महिलेने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर ठाण्यात सात जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, २०१४ मध्ये ती प्रवास करत असताना ती तिची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेला बीड शहरातील कबाड गल्लीतील एका खोलीवर बोलावले. महिला तिथे आल्यावर पिंपळे याने तिच्यावर अत्याचार केला. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला.

आणखी धक्कादायक म्हणजे पुढे त्याने त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले याच्यासोबतही पीडित महिलेला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर पुढे गोरख इंगोलेनेही महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार केला. सन २०१५ मध्ये गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केला. त्यातच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गोरख इंगोले याने सन २०२० मध्ये जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून एका घाटात नेले. तिथे गेल्यावर त्याच्या ४ मित्रांकडून महिलेवर आळीपाळीने तब्बल ६ तास तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान महिला गर्भवती राहिली. त्यामुळे गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.

अशा या सर्व वाईट प्रकार मानसिक छळ व शारीरिक अत्याचाराला कंटाळून पीडित महिला माजलगावी येऊन एका हॉटेलमध्ये नोकरी करु लागली. पण येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तर संदीप पिंपळे (रा. बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा, ता. जि.बीड) यांच्यासह एका अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे आता बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Beed Crime Gang Rape on Widow


Previous Post

पती हरवल्याची तक्रार घेऊन आली… पोलिसांनी तपास केला… उघड झाल्या या धक्कादायक बाबी…

Next Post

कर्नाटकच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे ५ महत्त्वाचे निर्णय

Next Post

कर्नाटकच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे ५ महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023

त्र्यंबकेश्वर येथे ४४ वर्षानंतर एकत्र आले दहावीचे वर्गमित्र

May 28, 2023

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

May 28, 2023

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group