शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुणे शहरासह जिल्ह्यातील CNG वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त

पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने १ नोव्हेंबरपासून संप

by India Darpan
ऑक्टोबर 15, 2022 | 3:07 pm
in संमिश्र वार्ता
0
CNG Gas

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही पुणेकर असाल आणि तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने येत्या १ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार आहेत. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी पुण्यात टोरंट सीएनजी संपाच्या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसी, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक तसंच पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकाराही देखील हजर होते. या बैठकीत टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपली मागणी लावून ठरली. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या २० ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा संप ११ दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. संपामुळे पुणेकरांचे हाल होण्याची दाट भीती आहे. सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचे काय होणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, त्याआधीच या संपावर तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी केला होता लाक्षणिक बंद
१ ऑक्टोबर रोजी टोरंट सीएनजी पंप चालकांनी एक दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या संपात ६० सीएनजी पंप चालक सहभागी झाले होते. या संपावेळी टोरंट सीएनजी पंप सोडले, तर इतर पेट्रोल पंप आणि एमएनजीएलकडून पुरवठा केला जाणारे सीएनजी पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा तितकाचा फटका पुणेकरांना जाणवला नव्हता.

Pune CNG Supply Petrol Pump Dealer Association

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हॉटेल व्यावसायीक बापलेकांनी मेडिकल स्टोअर्स चालकास केली बेदम मारहाण

Next Post

पुण्याच्या महिलेच्या गळयातील ६० हजाराचा राणीहार दुचाकीस्वारांनी केला लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पुण्याच्या महिलेच्या गळयातील ६० हजाराचा राणीहार दुचाकीस्वारांनी केला लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011