पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल (नाना) काटे यांचा पराभव झाला आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे.
पिंपरी चिंचवड येथील भाजपचे नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्यामुळे त्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होणार याचे गणित मांडले जात आहे. विठ्ठल काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांचे ते उमेदवार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी प्रचार केला. भाजपनेही मोठी फौज उतरविली होती.
मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अश्विनी जगताप यांनी २५ हजार ३३९ मतांनी भाजपचे अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. २९ व्या फेरी अखेर ताजी आकडेवारी अशी
अश्विनी जगताप – भाजप – १०८३४४
विठ्ठल (नाना) काटे – राष्ट्रवादी काँग्रेस – ८३००५,९८६
राहुल कलाटे – अपक्ष – ३५३६३
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1631200546106273794?s=20
Pune Chinchwad By Poll Election Counting Current Updates