पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल अखेर रात्री १ वाजून ७ मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आला. हा पुल पाडण्यासाठी पुलाला १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले होते. तर ६०० किलो स्फोटके यासाठी वापरण्यात आली. वाहतूकीची कोंडी करणा-या या पुलाच्या पाडण्याची गेले अनेक दिवस जय्यत तयारी सुरु होती. अखेर हा पुल पाडण्यात आला. बघा व्हिडिओ