India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोटनिवडणुकीसाठी भाजपची ‘मोर्चेबांधणी’! फडणवीसांच्या मध्यरात्री उशीरापर्यंत गाठीभेटी; कुणाशी आणि का?

India Darpan by India Darpan
February 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कसबा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपकडून मोर्चेबंधणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. अलीकडेच त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर तब्बल ३ तास अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांचाही समावेश होता. बालन यांच्यासोबतच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सावरकर स्मारक समितीच्या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस बुधवारी सायंकाळी पुण्यात आले होते. बैठकीनंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या घरी गणेश उत्सव मंडळांचे आधारस्तंभ पुनीत बालन यांची भेट घेतली. सुमारे २० मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली. कसबा मतदारसंघातील दीडशेहून अधिक गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत करण्यात आली होती. या मदतीमुळे कोरोनाच्या साथीनंतरचा गणेशोत्सव मंडळांना चांगल्या पद्धतीने साजरा करता येऊ शकले होता. यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते बालन यांच्याशी व्यक्तीशी जोडली गेलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बालन यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे. बालन यांच्याकडून मात्र याविषयावर कुठलीच प्रतिक्रिया अद्याप आली नाही.

ते स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत आणि आमच्यावर आरोप कशाला ?
चिंचवडमध्ये एक गोष्ट पक्की आहे. इथे लक्ष्मणभाऊंचे काम असे आहे की त्यांनी…

📍काल रात्री चिंचवड येथे माध्यमांशी संवाद.. pic.twitter.com/xcaXH84Ztn

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2023

दगाफटका टाळण्याचे प्रयत्न
कसब्यात विजयासाठी फडणवीस स्वतः मोर्चेबांधणी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून कसबा मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या सराफ असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद्र रांका यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची रात्री उशिरा बैठक घेतली. जवळपास ३ तास देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. एकीकडे विजयासाठी आवश्यक गोळाबेरीज करायची, त्याचवेळी दगाफटका टाळणे अशा दोन्ही मोर्चांवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे या भेटींवरून लक्षात येते.

| LIVE |📍पुणे | माध्यमांशी संवाद https://t.co/hsrXZhdEhN

— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 16, 2023

Pune By Poll Election BJP Politics Fadnavis Tour Midnight Meet


Previous Post

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

Next Post

ऑडिओ क्लिप व्हायरल होताच जितेंद्र आव्हाडांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

ऑडिओ क्लिप व्हायरल होताच जितेंद्र आव्हाडांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group