India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ; ऑक्सिजन लावून प्रचारात… आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल…

India Darpan by India Darpan
February 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट आजारी असतानाही प्रचाराच्या मैदानात उतरले. थेट ऑक्सिजन नळी लावून व्यासपीठावर आले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजप त्यांच्या जीवनाशी खेळ करत असल्याची टीका जगताप यांनी केली आहे.

राज्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करीत आहे.आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेपासून लांब असलेले बापट प्रचारासाठी पुढे आले आहेत. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन भाजपा नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.ते मागील अनेक दिवसांपासून एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत.

फडणवीसांची पोकळ प्रतिष्ठा राखण्यासाठी
भाजपाच्या किती ज्येष्ठ नेत्यांना अग्नीपरीक्षा द्यावी लागणार?

प्रसंग १ – नाकात ऑक्सिजनची नळी, बोटाला ऑक्सिमीटर आणि व्हिलचेअरवर बसून आजाराशी झुंजणारे गिरीश बापट कसबा विधानसभेच्या प्रचाराला आले. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/vyeIINKERq

— NCP (@NCPspeaks) February 17, 2023

‘पराभव दिसताच आठवण’
या संपूर्ण प्रकारानंतर व्हिडीओ पुढे आणत प्रशांत जगताप यांनी भजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मुळात गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली.मागील पाच वर्षापासून भाजपाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतून गिरीश बापट यांना बाजुला का ठेवण्यात आले? भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमात, मेळाव्यात गिरीश बापट यांचा साधा फोटो लावण्याचे औदार्यही भाजपाने दाखवले नाही. पण आज कसबा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार अडचणीत आल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला गिरीश बापट यांची आठवण झाली. हे एकूणच भाजपाच्या पराभवाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख.
देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले.
मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही !@MPGirishBapat #BJP #Pune pic.twitter.com/DZjKlnOYJ0

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2023

Pune BJP MP Girish Bapat Election Campaign Oxygen Support


Previous Post

भगत सिंह कोश्यारी यांनी घेतला महाराष्ट्राचा निरोप; त्यापूर्वी काय घडलं?

Next Post

नगरच्या लाचखोर पोलिसाने ५० हजाराची केली मागणी… एवढेच नाही तर थेट एसीबीलाही नडला… मग काय…

Next Post

नगरच्या लाचखोर पोलिसाने ५० हजाराची केली मागणी... एवढेच नाही तर थेट एसीबीलाही नडला... मग काय...

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group