इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालमध्ये एका महिला प्रोफेसरने विद्यार्थ्यांशी थेट वर्गात लग्न केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलचा चर्चेत आहे. या व्हिडिओत दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला. त्यानंतर प्रोफेसरच्या सांगण्यावरुन सिंदूरही लावला. या घटनेनंतर विदयापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून महिला प्रोफेसरला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
या प्रकाराची माहिती समोर आली आहे. एप्लाइड साइकोलॅाजी विभागाची प्रमुख प्राध्यपिका मंगळवारी हातात कंद आणि लाल साडी परिधान करुन वर्गात गुलाबाची माळ घेऊन पोहचल्या. त्यांच्यासोबत फर्स्ट ईअरचा विद्यार्थीही होता. वर्गाच्या मध्यभागी या दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच. त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण, हे केवळ नाटक होते. त्याला प्रोफेसरने मॅाक वेडिंग म्हटले. प्रोफेसरचे नाव पायल बॅनर्जी असून त्या अनेक वर्षापासून मानसशास्त्र शिकवतात.
महाविद्यालयात कोणत्या गोष्टी कराव्या किंवा करु नये याचे साधे संकेत असते. पण, महिला प्रोफेसरने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना सर्वत्र टिकेचा सामना आता करावा लागत आहे.