मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलीसांचे वेगवेगळय़ा भागात छापे…गावठी कट्टे बाळगणा-या तीघांना ठोकल्या बेड्या

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2025 | 3:30 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीसांनी वेगवेगळय़ा भागात छापे टाकत गावठी कट्टे बाळगणा-या तीघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत कारसह चार गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी उपनगर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ आणि गुंडा विरोधी पथकाने केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर येथील वैभव लक्ष्मी लॉन्स व बॅक्वेट हॉल परिसरात फिरणा-या तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास पथकाने धाव घेत युवराज अनिल निकम (२४ रा.कोणार्क नगर,बालाजी चौक,शिक्षक कॉलनी आडगाव) या युवकाच्या मोतीराम आढाव चौकात मुसक्या आवळल्या. संशयिताच्या अंगझडतीत देशी बनावटीच्या पिस्तूलसह जीवंत काडतुसे मिळून आले असून याबाबत युनिटचे अंमलदार संजय पोटींदे यांनी फिर्याद दिली आहे.

दुसरी कारवाई गुंडा विरोधी पथकाने लॅमरोड भागात केली. पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. विहीतगाव येथील महाराजा बसस्टॉप भागात एका तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.३०) रात्री पथकाने धाव सोमेश्वर उत्तम हंगरगे (२७ रा.स्वागत ए बिल्डींग महाराजा बस स्टॉप विहीतगाव) या संशयितास बेड्या ठोकल्या. हंगरगे याच्या अंगझडतीत लोखंडी पिस्तूलसह काडतुसे मिळून आले आहे. दोघा घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी व हवालदार बरेलीकर करीत आहेत.

तिसरी कारवाई इंदिरानगर भागात करण्यात आली. समर्थनगर भागातील प्रथमेश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमध्ये पिस्तूल असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२९) सायंकाळी पथकाने धाव घेत पार्किंगमधील वाहनाची तपासणी केली असता एमएच ०४ सीझेड ०७२५ या सेट्रोकारच्या मागील सिटावर दोन पिस्तूल आणि आठ जीवत काडतुसे आढळून आले. या कारवाईत कारसह पिस्तूल आणि काडतुसे असा सुमारे ३ लाख ८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याप्रकरणी युनिटचे हवालदार मनोज परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ध्रुपकरण रामलगन चौधरी (४६ मुळ रा. उत्तरप्रदेश हल्ली प्रथमेश अपा.जगन्नाथ चौक,समर्थनगर इंदिरानगर) यांच्याविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सनार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये दोघा डॅाक्टर मित्रांनी तिसऱ्या डॅाक्टर मित्राच्या मेंदूवर केली क्लिष्ट शस्रक्रिया

Next Post

महिला प्रोफेसरने विद्यार्थ्यांशी थेट वर्गात केले लग्न…बघा व्हायरल व्हिडिओ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20250131 154537 Dailyhunt

महिला प्रोफेसरने विद्यार्थ्यांशी थेट वर्गात केले लग्न…बघा व्हायरल व्हिडिओ

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011