नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दैनंदिन जीवनात कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करताना रोजच्या जगण्यासाठी पैसे लागतात, त्यामुळे महागाईच्या जमान्यात खूप खर्च होतो. तरीही भविष्याची तरतूद म्हणून अनेक जण बँकेत बचत खाते उघडतात. परंतु त्यापेक्षाही सुरक्षित मार्ग म्हणजे एफडी किंवा फिक्स डिपॉझिट होय. मात्र आता तीन खासगी बँकांनी फिक्स डिपॉझिट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय, आयडीबीआय आणि एचडीएफसी या तीन बँकांची एफडी सेवा १ ऑक्टोबरपासून बंद झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
सुरक्षित योजना :
देशातील बहुतेक नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण तेथे त्यांचे कष्टाचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यांना निर्धारित कालावधीत चांगला परतावा मिळत राहतो. मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याचे कारण म्हणजे कोणत्याही बँकेच्या बचत खात्यावर विशिष्ट कालावधीत मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त नफा देते आणि त्यांचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतात.
तीन बँकांचा निर्णय :
सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्रातील क्षेत्रातील बँकांनी कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना राबवली होती. सदर मुदत ठेव योजना बँका बंद करणार आहेत. त्यामुळे एचडीएफसी, आयडीबीआय, एसबीआय या बँकांची एफ सेवा उद्यापासून म्हणजे दि. १ ऑक्टोबर पासून एफडी योजना बंद झाली आहे. कारण त्यावेळी मुदत ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याज दरांपेक्षा या एफडीवर व्याजदर जास्त देण्यात येत होता.
मुदत ठेवींमधील गुंतवणुकीच्या कालावधीत व्याजदरात कोणताही बदल होत नाही. अशा मुदत ठेवींना फिक्स्ड रेट एफडी म्हणतात. दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी दरांशी संबंधित मुदत ठेवींचे व्याज दर बदलत राहतात. अशा मुदत ठेवींना फ्लोटिंग रेट एफडी म्हणतात. मात्र जेव्हा आरबीआयने रेपो दर वाढवला आणि अनेक सार्वजनिक व खासगी बँकांनी मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले तेव्हा फ्लोटिंग रेट एफडी चर्चेत आली.
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. ३० सप्टेंबर २०२२ ही या योजनेची शेवटची तारीख असेल, असे बँकेने जाहीर केले होते. बँक या मुदत ठेवीवर 0.75 टक्के अधिक व्याज देत होते. खरे म्हणजे एफडीवरील व्याजदर आधीच ठरवतात. अद्याप सर्व बँकांनी फ्लोटिंग रेट एफडीचा पर्याय दिलेला नाही. तसेच आयडीबीआय बँकेने या वर्षी एप्रिल मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरु केली होती. ही योजनाही दि. ३०सप्टेंबर २०२२ रोजी बंद झाली आहे.
एसबीआयकडून थोडा दिलासा
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) वीकेअर मुदत ठेव योजनेत मात्र एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. वास्तविक मुदत संपत असतानाच बँकेने ही योजना दि.२३ मार्च २०२३पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय शिवाय आयडीबीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही त्यांच्या ठेवींच्या दरांमध्ये काही दिवसांपूर्वी बदल केले होते. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला होता.
Private Nationalized Banks Closed FD Scheme
Banking Finance Investment