शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नरेंद्र मोदींच्या ताफ्यात येणार ही अनोखी कार; ठरणार जगातील पहिलेच पंतप्रधान!

by Gautam Sancheti
ऑगस्ट 13, 2022 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
pm modi car

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कच्चे तेल म्हणजेच पेट्रोल डिझेल सारखे इंधन याचा साठा भविष्यात संपणार आहे, त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर करणे सर्व जगासाठी मोठे आव्हान ठरले आहे. त्यातच पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने यासाठी देशाचा प्रचंड पैसा कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होतो. तसेच पेट्रोल डिझेल सारख्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वाढवून पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळेच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कार वापराला प्रोत्साहन दिले असून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाडी दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्मड इलेक्ट्रिक कार वापरणारे जगातील पहिले पंतप्रधान म्हणून नावारुपाला येतील. तसेच यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी सामान्य नागरिकही आकर्षित होतील, असे सांगण्यात येत आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यात मोदी मर्सिडीज मेबॅच S650 गार्ड सारख्या अनेक आर्मर्ड लक्झरी गाड्या आहेत. लवकरच पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक कारचा समावेश होऊ शकतो. जगातील इतर मोठे नेते सुद्धा बख्तरबंद गाड्या वापरतात, पण त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार दिसत नाहीत. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी इलेट्रिक गाड्या वापरण्याचे सरकार सांगत आहे. त्यात आता खुद्द पंतप्रधानांच्या ताफ्यातच इलेक्ट्रिक गाडी दाखल होणार आहे.

एका रिपोर्टनुसार, मोदींच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कारचा समावेश करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात मर्सिडीज Maybach S650, Range rover आणि Toyota Land Cruiser यांसारख्या आर्मड गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या बुलेटप्रूफ असून यांमुळे स्फोटांपासूनही संरक्षण होते. त्यामुळे मोदींच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या तर त्या सुद्धा आर्मड कार प्रमाणेच पॉवरफुल असतील.

मोदींच्या ताफ्यात नेमक्या कोणत्या इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश करण्यात येईल याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. आर्मड इलेक्ट्रिक कारची नेमकी संख्या सध्या उपलब्ध नसल्यामुळे याबाबत आताच माहिती देणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी कोणती इलेक्ट्रिक कार निवडली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इलेक्ट्रिक कारचे युग सर्वांसाठी अगदी नवीन आहे आणि आर्मर्ड इलेक्ट्रिक कारची नेमकी संख्या सध्या उपलब्ध नाही.

पंतप्रधान मोदींचे SUV प्रेम सर्वश्रुत आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी SUV इलेक्ट्रिक कारची निवड केली, तर मर्सिडीज EQS SUV हा चांगला पर्याय ठरू शकतो. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार भरपूर सबसिडी देतात. लोकांनी इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. भारतीय ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्यास तेलावरील आपले अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल.

खुद्द पंतप्रधानांनीही इलेक्ट्रिक कार वापरली तर त्याचा संदेश दूरपर्यंत जाईल. मर्सिडीज Maybach S650 गार्डशिवाय रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरचाही पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. बख्तरबंद गाड्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या कार बुलेटप्रूफ आहेत आणि स्फोटांपासून संरक्षण करतात. इलेक्ट्रिक कारही या कार्सप्रमाणेच पॉवरफुल बनवल्या जातील. साहजिकच कालानुरूप देशाच्या पंतप्रधानांच्या ताब्यातील गाड्यांमध्ये बदल झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी खूप वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या गाड्यांच्या ताब्यामध्ये साधारणतः अॅम्बेसेटर कार असे असत असे जुने जाणते व वयोवृद्ध नागरिक सांगतात.

Prime Minister Narendra Modi Luxurious Car
Electric Car SUV Mercedez Armored Car

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…तर झाले असते मुमताज आणि शम्मी कपूर यांचे लग्न

Next Post

पेट्रोल-डिझेलमधील भेसळ ओळखायची आहे? फक्त हे करा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
petrol diesel1

पेट्रोल-डिझेलमधील भेसळ ओळखायची आहे? फक्त हे करा...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011