इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारावेळी त्यांचे निधन झाले. हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. दि. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. परंतु पंतप्रधान असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या समोर देशभरातील अनेक समस्या तसेच विकास कामांचे मुद्दे उभे असतात, दुःखाच्या प्रसंगी त्यांना त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मातृवियोगाच्या दु:खाला सामोरे जावे लागले मात्र या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्य तत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल. अंत्यसंस्कारासाठी भल्या पहाटेच पंतप्रधान दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले. त्यानंतर अंत्यविधीचे सारे सोपस्कार पार पाडले आणि तिथूनच ते अहमदाबादच्या राजभवनाकडे रवाना झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनला त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.
विशेष म्हणजे कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आपली सारी कर्तव्य पार पडताना दिसले. आई हिराबेन निधनानंतर या दु:खाच्या प्रसंगातही पंतप्रधानांनी त्यांच्या कर्तव्यभावनेचा विसर पडू दिला नाही. दुपारी ते अहमदाबादच्या राजभवनाकडे रवाना झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनला त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. प्रत्यक्ष उपस्थितत न राहिल्यामुळे त्यांनी बंगालच्या जनतेची माफी मागितली. हावडा ते न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1608711589212962818?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw
आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच कामाला लागले. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या आईची तब्येत खालावल्याची बातमी होती. बुधवारीच पंतप्रधान अहमदाबामधल्या यू एन हॉस्पिटलमध्ये तातडीने पोहचले होते. त्यावेळीही दीड तास ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर ते पुन्हा दिल्लीत आले होते. पण आज पहाटे साडेतीन वाजता हिराबेन यांच्या दु:खद निधानाची वार्ता कानावर आली. पंतप्रधान मोदी यांनीच ट्विट करुन ही माहिती देशवासियांना दिली.
आईचे निधन झाले तरी पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमात खंड पडणार नाही असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले होते. बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनची सुरुवात आणि त्यानंतर गंगा कौन्सिलची बैठक असे दोन नियोजित कार्यक्रम होते. प्रत्यक्ष उपस्थिती लावू शकले नाहीत तरी पंतप्रधानांनी ऑनलाईन हजेरी लावली. शिवाय निधनानंतर परिवाराकडून जो संदेश देण्यात आला त्यातच सर्वांनी आपली कामे करत राहा, तीच हिराबेन यांना खरी श्रद्धांजली असेल असे म्हटले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचे भावनिक संबंध यांचे दर्शन अनेकदा देशवासियांना झाले आहे. पण आईनेच दिलेल्या कर्तव्य तत्परतेचा धडा पंतप्रधानांनी इतक्या कठीण प्रसंगतातही अंमलात आणला आहे. त्यामुळे भावनेबरोबर कर्तव्य देखील महत्त्वाचे ठरते, असे म्हणता येईल.
https://twitter.com/RailMinIndia/status/1608737796768018432?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw
Prime Minister Narendra Modi Attend All Meetings After Mother Death