India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अजित पवारांवर ‘मविआ’चेच आमदार नाराज? नेमकं काय घडलं? असं अविश्वासाचं वातावरण काय तयार झालं?

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला. मात्र महाविकास आघाडीचे घटकपेक्षा असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्ये एकजूट नसल्याचे दिसून येत आहे. विधानसभाध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित यांची सही नसल्याचे समोर आले आहे. यासाठी अजित पवारांना विश्वासात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे अविश्वास ठराव नेमका कोणाविरूद्ध आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधातील की विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधातला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरले. सर्वप्रथम सीमावादाचा मुद्दा गाजला. त्यानंतर गायरान जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. तर दुसरीकडे, कर्नाटक विरोधी ठराव संमत करण्यात आला. आज अधिवेशनाचा संपले आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठरावाचा प्रस्तावाचे पत्र विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिले आहे.

अविश्वासाच्या या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजूट नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अविश्वासाच्या या ठरावाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नेमके काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून अजित पवारांच्या या विधानावर खोचक टोला लगावण्यात आला आहे. दरम्यान, मविआच्या काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.

काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिल्याचे सांगितले जात आहे. या पत्रावर ३९ आमदारांची सही असल्याचेही बोलले जात आहे. विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी आरोप केला आहे की आम्हाला सभागृहात बोलू दिले गेले नाही. विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करीत आहेत. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप आमदारांनी केला आहे.

अविश्वास ठरावाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे अजित पवार म्हणाले. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अध्यक्षांविरोधातल्या अविश्वासाच्या या ठरावाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दलच अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, पक्षप्रमुखांच्या संमतीने आम्ही अविश्वास ठरावाच्या पाठिशी असल्याची भूमिका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने घेतली आहे.

Opposition Leader Ajit Pawar Politics MVA MLA
Maharashtra Assembly Winter Session Nagpur
Speaker No Confidence Letter Signature


Previous Post

आईच्या निधनानंतरही पंतप्रधान मोदींची सर्व बैठकांना हजेरी; दुःखद प्रसंगातही दिला कर्मयोगाचा धडा!

Next Post

विधिमंडळ अधिवेशन आटोपताच राज्य सरकारने केल्या या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

विधिमंडळ अधिवेशन आटोपताच राज्य सरकारने केल्या या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group