साओ पाउलो (ब्राझिल) – जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरूच असल्याने अनेक देशात अद्याप कठोर आणि कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना सूट मिळालेली दिसते. परंतु ब्राझीलमध्ये मात्र अत्यंत कठोर नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. येथील राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना सँटोस आणि ग्रीमियो यांच्यातील फुटबॉल लीग सामन्याला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. कारण लशीकरण नसलेल्या समर्थकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळेच बोल्सोनारो हा सामना पाहू शकले नाहीत.
बोलसोनारो यांनी सांगितले की, समर्थकांच्या उपस्थितीत मला सँटोसचा सामना पाहायचा होता. परंतु आयोजकांनी सांगितले की, यासाठी तुम्हाला लशीकरण करणे आवश्यक असून लशीकरणच्या पुराव्याची काय गरज आहे? मात्र बोल्सोनारो यांनी कोरोना लसीकरण करण्यास नकार दिला आहे. कारण त्यांचा असा दावा आहे की, आधीच कोरोनाची लागण झाली आहे, म्हणून त्यांच्या शरीरात अॅन्टी बॉडीज आहेत.
ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने मान्य केलेल्या प्रोटोकॉलमध्ये असे म्हटले आहे की, केवळ लशीकरण केलेल्यांना स्टेडीयममध्ये उपलब्ध असेल. दरम्यान काही आरोग्य तज्ज्ञ राष्ट्राध्यक्षांवर टीका करत आहेत. कारण बोलसोनारो हे लॉकडाऊनच्या विरोधात होते. तसेच त्यांनी लसींबद्दल देखील संशय व्यक्त केला असून नियमितपणे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास नकार दिला आहे. कारण आता ब्राझीलमधील संसर्ग कमी होत आहेत.