नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (२५ जुलै) आपल्या कार्यकाळातील चौथे वर्ष पूर्ण केले आहे. या काळात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांची ६३ विधेयके मंजूर केली आहेत. ७६ वर्षीय कोविंद यांनी २५ जुलै २०१७ रोजी देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतिपदी शपथ घेतली होती.
राष्ट्रपती भवनमध्ये या निमित्ताने ट्विटरवर एका ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रपतींच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा उल्लेख आहे. या ई-पुस्तकानुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा दौरा केला. या दौर्यांदरम्यान त्यांनी ७८० लोकांची भेट घेतली. राज्यघटनेच्या संरक्षकाच्या रूपात राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळांच्या सदस्यांसह देशाच्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्र सरकारच्या ४३ आणि राज्य सरकारांच्या २० विधेयकांना मंजुरी दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित प्रीतीभोजमध्ये कोविंद यांनी दिल्लीमध्ये काम करणार्या काही कोरोनायोद्ध्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. त्यादरम्यान राष्ट्रपतींनी त्यांचा उत्साह आणि कामाप्रती समर्पणाबाबत कौतुक केले. राष्ट्रपतींनी ट्रेंड नर्सेस असोसिएशन, मिलिट्री नर्सिंग सर्व्हिस, राष्ट्रपतींच्या अॅस्टेट क्लिनिकच्या नर्स यांच्याबरोबर राखीपौर्णिमा साजरी केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी परदेशी मिशनच्या २३ प्रमुखांचे परिचयपत्र स्वीकारले.
लष्कराचे सर्वोच्च कमांडर म्हणून राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकमधील कोडागूच्या मदिकेरीमध्ये जनरल थिमय्या संग्रहालयाचे उद्घाटन केले. स्वराज बेटांअंतर्गत त्यांनी अंदमान आणि निकोबार कमान संयुक्त सेवा अभियानांचा आढावा घेतला.
ई बुक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे