इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील एका कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी एका इंजिनीअरला अखेर निलंबित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या (पीएचईडी) एका ज्युनिअर इंजिनीअरने एक आठवड्यापूर्वी जयपूरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने त्या महिला इंजिनीअरला निलंबित केले आहे.
महिला अभियंता निलंबित
मुख्य अभियंता प्रशासन पाणीपुरवठा विभागाने १२ जानेवारी रोजी ज्युनिअर इंजिनीअर अंबा सोल यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारीला एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. स्काऊट गाईड जांबोरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू पाली येथे आल्या होत्या.
गृहमंत्रालयाने मागवला होता अहवाल
हे प्रकरण गांभीर्याने घेत गृह मंत्रालयाने अहवाल मागवला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहून 12 जानेवारी रोजी विभागाने ज्युनिअर इंजिनीअर अंबा सोल यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आणि तिचे मुख्यालय बारमेर येथे हलवले. बदलीनंतर 6 महिन्यांपासून सेऊल PHED विभागाच्या रोहत कार्यालयात कार्यरत आहेत.
4 जानेवारीची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी रोजी पाली येथील निंबळी येथील जांबोरी येथे बांधण्यात आलेल्या हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी हेलिपॅडवर उभे असलेल्या राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह आठ अधिकाऱ्यांच्या रांगेत एक मुलगी अचानक उभी राहिली. राष्ट्रपती उतरल्यावर सुरक्षेचा भंग झाला. प्रोटोकॉल तोडून या मुलीने अगदी जवळ जाऊन राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श केला होता. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकासह अधिकार्यांनी या महिलेला तत्काळ तेथून दूर केले. नंतर तिला रोहत पोलीस ठाण्यात नेऊन चौकशीही करण्यात आली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर गृह मंत्रालय, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनीही तपास केला.
https://twitter.com/news24tvchannel/status/1614162296087142400?s=20&t=auoW22_2RUPslzCFUa6IQg
President Murmu Security Break Engineer Suspend