India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करणारी इंजिनीअर अखेर निलंबित

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील एका कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी एका इंजिनीअरला अखेर निलंबित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या (पीएचईडी) एका ज्युनिअर इंजिनीअरने एक आठवड्यापूर्वी जयपूरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने त्या महिला इंजिनीअरला निलंबित केले आहे.

महिला अभियंता निलंबित
मुख्य अभियंता प्रशासन पाणीपुरवठा विभागाने १२ जानेवारी रोजी ज्युनिअर इंजिनीअर अंबा सोल यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारीला एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. स्काऊट गाईड जांबोरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू पाली येथे आल्या होत्या.

गृहमंत्रालयाने मागवला होता अहवाल
हे प्रकरण गांभीर्याने घेत गृह मंत्रालयाने अहवाल मागवला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहून 12 जानेवारी रोजी विभागाने ज्युनिअर इंजिनीअर अंबा सोल यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आणि तिचे मुख्यालय बारमेर येथे हलवले. बदलीनंतर 6 महिन्यांपासून सेऊल PHED विभागाच्या रोहत कार्यालयात कार्यरत आहेत.

4 जानेवारीची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी रोजी पाली येथील निंबळी येथील जांबोरी येथे बांधण्यात आलेल्या हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी हेलिपॅडवर उभे असलेल्या राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह आठ अधिकाऱ्यांच्या रांगेत एक मुलगी अचानक उभी राहिली. राष्ट्रपती उतरल्यावर सुरक्षेचा भंग झाला. प्रोटोकॉल तोडून या मुलीने अगदी जवळ जाऊन राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श केला होता. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकासह अधिकार्‍यांनी या महिलेला तत्काळ तेथून दूर केले. नंतर तिला रोहत पोलीस ठाण्यात नेऊन चौकशीही करण्यात आली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर गृह मंत्रालय, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनीही तपास केला.

महिला इंजीनियर ने छुए राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के पैर, राजस्थान सरकार ने इंजीनियर को कर दिया सस्पेंड

◆ Video आया सामने

Draupadi Murmu | #DraupadiMurmu pic.twitter.com/VOxLy27NxT

— News24 (@news24tvchannel) January 14, 2023

President Murmu Security Break Engineer Suspend


Previous Post

‘पठाण’च्या बेशरम गाण्यावर गौरी खानने दिली ही प्रतिक्रीया

Next Post

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ

Next Post

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group