India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढला….. अखेर झाली ही मोठी कारवाई…

India Darpan by India Darpan
May 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ओडिशा दौरा सध्या चर्चेत आहे.. यापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा वाद झाला. आता एकाने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढल्याची बाब पुढे आली आहे. याची गंभीर दखल घेत मयूरभंजच्या मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने (CDMO) फार्मासिस्टला निलंबित केले आहे.

फार्मासिस्ट जशोबंत बेहरा याने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढला. तसेच तो फेसबुकवर पोस्ट केला. त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली.  सीडीएमओ डॉ. रुपभानू मिश्रा यांनी बेहरा याला निलंबित केले आहे. बेहरा ५ मे रोजी सिमिलीपाल नॅशनल पार्कच्या भेटीदरम्यान राष्ट्रपतींच्या वैद्यकीय पथकात तैनात होते.

फार्मासिस्ट म्हणाला…
निलंबनानंतर स्पष्टीकरण देताना बेहरा म्हणाला की,, “मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर फक्त आठवणी आणि आनंदासाठी काही फोटो टाकले होते. हे करण्यामागे माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. मात्र, हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या हवाई दलाच्या काही जवानांची मी तोंडी परवानगी घेतली होती. राष्ट्रपतींसारखे महान व्यक्तिमत्व जिल्ह्यात आले होते आणि मी हेलिपॅडवर ड्युटीवर होतो, त्यामुळे आठवण म्हणून काही चित्रे ठेवावीशी वाटली. हेलिकॉप्टरजवळून मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत.

वीज खंडित झाल्याने हल्लाबोल
दरम्यान, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या महाराजा श्रीरामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात वीजपुरवठा खंडित झाला. या प्रकरणाला विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) आक्रमक भूमिका घेतली आहे. देशाच्या प्रथम नागरिकाचा दीक्षांत समारंभात समावेश करावा, अशी मागणी करत राजकीय वळण घेतले आहे. भाषणादरम्यान राष्ट्रपतींना सुमारे नऊ मिनिटे अंधारात ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

या प्रकरणी मयूरभंज जिल्हा दंडाधिकारी आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिशेश्वर तुडू यांनी केली आहे. भाजपच्या मयूरभंज जिल्हा युनिटनेही राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजपने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींचा अवमान करण्यासाठी हे कृत्य झाल्याचा संशयही भाजपने उपस्थित केला.

संबंधित घटनेमध्ये, मयूरभंज जिल्ह्यातील भांजा सेना या स्थानिक संघटनेने सांगितले की, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात वीज बिघाडासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई न झाल्यास ते बंदचे आयोजन करतील.

President Helicopter Photo Action on Pharmacist


Previous Post

सोन्याचे दर कुठवर जाणार? गुंतवणूक करावी की नाही? तज्ज्ञ म्हणतात…

Next Post

सावरकरनगर मध्ये तरुणास बेदम मारहाण; चार जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सावरकरनगर मध्ये तरुणास बेदम मारहाण; चार जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group