सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील कांदा हे शेतक-यांच प्रमुख व हक्काचे पीक असून कांद्याच्या दरावर त्याचे अर्थकारण चालत असते मात्र सध्या कांद्याचे ढासळते दर पाहता शेतक-याला त्याच केलेल्या खर्चाचा मोबदला सुध्दा मिळत नसल्याने प्रहार संघटनेने आज सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कांद्याला हमी भाव मिळावा, नाफेड मार्फत सुरु केलेली योजना फसवी असून ती हितकारी नाही. तसेच केंद्राने आयात-निर्यात धोरण चुकीच असल्याने कांद्याची निर्यात झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने याकडे लक्ष न दिल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा यावेळी प्रहारच्या पदाधिका-यांनी दिला.