अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्य सरकारने सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केल्यानंतर राज्यभर शासकीय कार्यालय, खासगी आस्थापनासह प्रत्येक ठिकाणी आज सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. सकाळी ११ वाजता मनमाड मधील प्रगती अर्बन को-ऑप बँकेतील कर्मचारी, खातेदार यांनी सरकारने केलेल्या आवाहनाला साथ देत सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. यावेळी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते. या गायनानंतर बँकेचे कामकाज नियमीतपणे सुरु झाले…