विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
राजकारणात काका-पुतण्याचे युद्ध सर्वश्रृत आहे. देशाच्या राजकारणात काका-पुतण्यावरुन अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काही तर अजरामरच आहेत. आताही तशीच घटना होत आहे. काकाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविल्यानंतर पुतण्याने मोठा निर्णय घेऊन आपणही कच्चे खेळाडू नसल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी राजकीय हालचलींना वेग आला असून पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) कोट्यातून पशुपती पारस यांची मंत्री म्हणून नेमणूक होताच त्यांचे पुतणे यांनी चिराग पासवान उच्च न्यायालयात धाव घेतली असून लोकसभेच्या सभापतींच्या निर्णयाला दिले आव्हान दिले आहे.
चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) खासदार संख्ये संदर्भात लोकसभेच्या सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कारण सभापतींकडून चिराग यांचे काका पशुपति पारस यांच्या नेतृत्वाखालील गटातील सदस्यांना एलजेपी गट म्हणून मान्यता देण्यात आली होती.
आता चिराग पासवान यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयात दि. ९ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाया आणि पक्ष नेतृत्त्वाचा विश्वासघात केल्यामुळे लोक जनशक्ती पक्षाने पशुपती पारस यांना यापूर्वीच पक्षातून काढून टाकले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी असे म्हटले आहे की, खासदार पारस हे लोजपाचे सदस्य नाहीत. एलजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण ७५ सदस्य आहेत आणि यापैकी सदस्य आमच्यासोबत (चिराग गट) असून सर्वांनी प्रतिज्ञापत्रेही दिली आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. खासदार चिराग म्हणाले की, त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांना कोणालाही आधार नाही आणि ते आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत.