मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यानुसार राज्यातील शिंदे सरकार कायम राहिले आहे. मात्र, न्यायालयाने शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच, राज्यपालांचे सर्वच निर्णय चुकीचे ठरविले आहेत. यासंदर्भात आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रीया आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना-बाळासाहेब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य आले आहे. विधानसभेच्या बहुमत चाचणी पूर्वीच उद्धव यांनी राजीनामा दिला याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट मत व्यक्त केले आहे. जर, उद्धव यांनी राजीनामा दिला नसता आणि ते बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर ते पुन्हा मुख्यमंत्री राहू शकले असते असे न्यायालयाने म्हटले आहे.
यासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी माझ्या पाठीत वार केले. ज्यांना पक्षाने सर्वस्व दिले, त्यांनी विश्वासघात केला. देशद्रोही हे जनतेला सोबत घेऊन सरकार कसे चालवू शकतो. अशा परिस्थितीत नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला. गद्दारांची साथ घेऊन मी सरकार कसे चालवले असते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव म्हणाले की, मी नैतिकता पाळली आहे, या मुख्यमंत्र्यांमध्ये काही नैतिकता असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
बघा, उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1656569802406625281?s=20
Politics Uddhav Thackeray on Supreme Court Order