India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अखेर ‘सामना’ टळला! उद्धव ठाकरे विधिमंडळात तर एकनाथ शिंदे दिल्लीत

India Darpan by India Darpan
December 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज विधिमंडळात चांगलाच सामना रंगेल असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधिमंडळात पोहचले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते आज आमने सामने येणार नाहीत. परिणामी, त्यांच्यातील बहुप्रतिक्षीत कलगीतुरा राज्यातील जनतेला आज पाहण्याचा योग टळला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत वीर बाल दिवस साजरा होत आहे. निमित्त विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. त्याची दखल घेत शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज सकाळीच त्यांचे नवी दिल्ली येथील विमानतळावर आगमन झाले. हा कार्यक्रम आटोपून शिंदे हे सायंकाळच्या सुमारासच नागपुरात परतणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, ठाकरे-शिंदे हा सामना आज टळला असल्याचे सांगितले जात आहे.

प्रधानमंत्री @narendramodi यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या #वीरबालदिवस निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे नवी दिल्ली येथील विमानतळावर आगमन झाले आहे. pic.twitter.com/cjcScDur2x

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 26, 2022

Politics Uddhav Thackeray in Assembly CM Shinde in Delhi


Previous Post

उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधान परिषदेत कडाडले; या प्रश्नावरुन सरकारला धरले धारेवर (बघा व्हिडिओ)

Next Post

उद्योगपती व व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणूगोपाल धूत यांना अटक; CBIची कारवाई

Next Post

उद्योगपती व व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणूगोपाल धूत यांना अटक; CBIची कारवाई

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group