नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज विधिमंडळात चांगलाच सामना रंगेल असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधिमंडळात पोहचले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते आज आमने सामने येणार नाहीत. परिणामी, त्यांच्यातील बहुप्रतिक्षीत कलगीतुरा राज्यातील जनतेला आज पाहण्याचा योग टळला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत वीर बाल दिवस साजरा होत आहे. निमित्त विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. त्याची दखल घेत शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज सकाळीच त्यांचे नवी दिल्ली येथील विमानतळावर आगमन झाले. हा कार्यक्रम आटोपून शिंदे हे सायंकाळच्या सुमारासच नागपुरात परतणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, ठाकरे-शिंदे हा सामना आज टळला असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1607261121760866304?s=20&t=a2_tj_YS14abcxHKcWsoOw
Politics Uddhav Thackeray in Assembly CM Shinde in Delhi