मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निशाणी हे दोन्गी गोठवल्याने आता ठाकरे आणि शिंदे गटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्ह काय असावे याबाबत आयोगाने प्रस्ताव मागवले आहेत. यासदंर्भात सोमवारी म्हणजे उद्या फैसला होणार आहे. आता उद्धव गटाने त्यांच्या पक्षाचे नाव आणि निशाणी निश्चित केली आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी तीन नावे आणि चिन्हांची यादी सादर केली आहे. यापूर्वी आयोगाच्या वतीने १९७ नावे व चिन्हांच्या यादीतून एक नाव मागविण्यात आले होते. उद्धव गटाची पहिली पसंती ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसऱ्या पसंतीमध्ये उद्धव गटाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव सूचवले आहे. उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह त्रिशूल, मशाल किंवा उगवता सूर्य असू शकते.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांचे नाव आणि चिन्हाचे तीन अंतिम पर्याय सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवायचे आहेत. उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमच्या गटाला १९७ चिन्हे आणि नावांची यादी दिली आहे. त्यापैकी तिघांचा विचार सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने तीन नावांना प्राथमिक संमती दिली आहे. आज दुपारी होणाऱ्या बैठकीत नाव निश्चित होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही दोन आवडती नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह त्रिशूल, मशाल किंवा उगवता सूर्य असू शकते.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर बंदी घातली आहे. दोघांना तीन नावे आणि चिन्हांची यादी देण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आयोगाने त्यांना १९७ नावांची यादी सादर केली होती. निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशानुसार आता दोन्ही गटांना लवकरात लवकर नवीन नावांची निवड करावी लागणार आहे. त्यांना वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप केले जाईल, जे ते उपलब्ध विनामूल्य चिन्हांच्या सूचीमधून निवडू शकतात.
Politics Shivsena Uddhav Thackeray Party Name Symbol









