सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शरद पवारांचं नेमकं चाललंय काय? आणखी एक संभ्रमी खेळी… बघा, संसदेत नेमकं काय घडलं…

by India Darpan
ऑगस्ट 8, 2023 | 12:50 pm
in इतर
0
sharad pawar praful patel

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली सेवा विधेयकाला राज्यसभेत राष्ट्रवादीच्या वतीने केवळ शरद पवार यांनीच विरोध केला, मात्र राष्ट्रवादीची एकूणच भूमिका संभ्रम निर्माण करणारी होती. त्यामुळे राज्यसभेत जे काही घडले त्यातून पवारांचा विधेयकाला पाठिंबा असल्याचेच चित्र होते.

मुळात दिल्ली सेवा विधेयकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिप जारी करणे अपेक्षित होते. पण ना शरद पवार गटाने व्हिप काढला ना अजित पवार गटाने. व्हिप काढून पक्षविरोधी भूमिका घेतली असती तर कारवाई झाली असती. अशात शरद पवार यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले खरे, पण प्रफुल्ल पटेल यांनी मतदानाच्या वेळीच दांडी मारली. अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेलही सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे ते विधेयकाच्या बाजुने मतदान करतील, असे वाटत होते. पण शरद पवार यांनी व्हिप जारी केला नाही आणि प्रफुल्ल पटेल मतदानाच्या वेळी हजर राहिले नाही.

राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांच्या भूमिका पक्षातील अंतर्गत वादाची चर्चा सातत्याने होत राहू नये, यासाठी असल्याचे बोलले जात आहे. तर काहींनी या भूमिकेतून शरद पवार यांनी ‘इंडिया’ला खुश केले आणि ‘एनडीए’लाही खुश केले, असे म्हणत आहेत. काहीच तासांपूर्वी शरद पवार यांनी निवडणुक आयोगाला दिलेल्या पत्रातील मजकूर उघड झाला होता. यात त्यांनी राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही प्रकारची फूट नाही आणि वादही नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे विरोधी आघाडीमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्ली विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेत घेतलेली भूमिका चर्चेत आहे.

मतदानावेळी मशीन बिघडले
दिल्ली विधेयकावर मतदान घेण्याच्या वेळीच राज्यसभेतील मशीन बिघडले. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे लागले. विधेयकाच्या बाजुने १३१ सदस्यांनी तर विधेयकाच्या विरोधात १०२ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला यश आले.

पक्षांतर बंदीचा धोका
राष्ट्रवादी पक्षाने व्हीप काढला असता, तर पक्षातील दोन गटांमुळे व्हीपचे उल्लंघन झाले असते. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकली असती. या कायद्यांतर्गत जर उमेदवाराने पक्षाचा व्हीप पाळला नाही तर, त्याच्या सदस्यत्वाला धोका निर्माण झाला असता. राष्ट्रवादी पक्षाने व्हीप न काढून आपल्या खासदाराचे सदस्यत्व वाचवले का? असाही प्रश्न निर्माण होतो.

पक्षातल्या अंतर्गत वादात कारवाईचा मुद्दा राष्ट्रवादीने शिताफीने टाळला

राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर मतदानासाठी प्रफुल्ल पटेल यांची गैरहजेरी

राष्ट्रवादीने आजच्या मतदानासाठी कुठला व्हीप पण काढलेला नव्हता

अंधेरा कायम रहें महामहीम?

— Prashant Kadam (@_prashantkadam) August 7, 2023
Politics Sharad Pawar NCP Strategy Parliament Whip
Delhi Bill Rajyasabha Praful Patel mp action
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘त्या’ प्रकरणानंतर किरीट सोमय्या पुन्हा सक्रीय… आता बाहेर काढला हा घोटाळा…

Next Post

रवींद्र वायकर हॉटेल प्रकरण… हायकोर्टाने उपस्थित केले हे प्रश्न… किरीट सोमय्यांनाही दणका…

Next Post
Ravindra Waikar

रवींद्र वायकर हॉटेल प्रकरण... हायकोर्टाने उपस्थित केले हे प्रश्न... किरीट सोमय्यांनाही दणका...

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011