इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक दिग्गज पक्षांना महाराष्ट्राच्या बाहेर एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. पण रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) मात्र नागालँडमध्ये आपला जलवा दाखवला आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत आठवलेंचे दोन आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नागालँडमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत 2018 मध्ये एनपीएफ ने 26 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीपीपीला 17 जागांवर आणि भाजपने 12 जागांवर विजय मिळविला होता. बाकीच्या जागा इतरांनी जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र गेल्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नव्हतं. यंदाच्या निवडणुकीत रामदास आठवलेंच्या आरपीआयने दोन आमदार निवडून आणत सर्वांनाच धक्का दिला आहे. आरपीआयच्या वाय. लिमा ओनेन चँग यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा जिंकली आहे. तर इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-II या जागेवर विजय मिळविला आहे. ईशान्येकडील तीन राज्य मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी, तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं.
https://twitter.com/RamdasAthawale/status/1631203452754984962?s=20
२०१८च्या निवडणुकीत
२०१८ च्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपने प्रथमच विजय मिळवला होता. 35 जागांवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला होता. सीपीएमच्या खात्यात 16 जागा आल्या होत्या. तर आयपीएफटीला 8 जागा मिळाल्या होत्या. तर त्रिपुरामध्ये काँग्रेसला मात्र खातंही उघडता आलं नव्हतं.
https://twitter.com/RamdasAthawale/status/1631202982867124226?s=20
कार्यकर्त्यांचा विजय
रामदास आठवले यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाने नागालँडमध्ये मिळविलेला विजय आनंददायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच देशभरातील आरपीआय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1631299139957866499?s=20
Politics Ramdas Athawale RPI Nagaland 2 MLA Win