India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे-फडणवीसांनी तळ ठोकूनही कसब्यात भाजपचा पराभव का झाला? ही आहेत कारणे…

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव धक्कादायक वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण या निवडणुकीत आपली नाव धोक्यात असल्याची जाणीव झाल्यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात तळ ठोकला. पण तरीही भाजपचा पराभव झाला. या पराभवाची विविध कारणे सांगितली जात आहेत.

पुण्यातील कसबा पोटनिवडणुक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला असता तर त्याची एवढी चर्चा झाली नसती. पण भाजपच्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार भाजपने उमेदवारी देण्यापासूनच अनेक चुका केल्या. या मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्यानंतर ब्राह्मण उमेदवारच द्यायला हवा होता, असे अनेकांचे म्हणणे होते. पण भाजपने हेमंत रासने यांच्या माध्यमातून बहुजन चेहरा दिला. महाविकास आघाडीसाठी हीच संधी होती. त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली.

रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा नव्हता. त्यांनी यापूर्वीही आपला कमाल या मतदारसंघात दाखवलेला आहे. शिवाय त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. लोकांना ते आपल्यातील वाटतात. कुठलाही बडेजाव नाही आणि मिरवणे नाही. लोकांमध्ये राहणे त्यांना आवडते. कसब्यामध्ये कुणीही त्यांना कारमध्ये बसून फिरताना बघितलेलं नाही. आपला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. अशात त्यांच्या बाजूने मतदारांचा कौल जाणे आश्चर्य वाटून घेण्यासारखे नव्हते. या एकूण परिस्थितीची जाणीव झाल्याने शिंदे आणि फडणवीस यांनी जनसंपर्काची मोहीम राबवली. शिंदे यांनी तर रात्री-अपरात्री लोकांच्या भेटी घेऊन रासने यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. याशिवाय अमित शहा, नितीन गडकरी या दिग्गजांनीही कसब्यात हजेरी लावली होती.

भाजपची मते काँग्रेसला
उमेदवारीवरून असलेल्या नाराजीने भाजपची २८ वर्षांपासूनची व्होटबँक काँग्रेसकडे वळली. केवळ कसब्यातील सर्वसामान्य जनतेनेच नव्हे तर भाजपच्याही लोकांनी धंगेकरांना मते दिली. त्यामुळेच त्यांना ११ हजार मतांनी विजय प्राप्त करता आला.

मनसे धंगेकरांच्या बाजूने
कसबा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीने धंगेकरांसाठी प्रचार केल्याची माहिती आहे. सोबतच सर्व पदाधिकाऱ्यांनीही धंगेकरांनाच मते दिली. विशेष म्हणजे पूर्वी धंगेकर मनसेत होते. २००९ च्या निवडणुकीत त्यांना मनसेनेच तिकीट दिले होते. आणि त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता.

दुरंगी लढत
कसबा पोटनिवडणूक आजपर्यंत तिरंगीच झालेली आहे. पण यावेळी प्रथमच दुरंगी लढत झाली. एकूण १७ उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत होते, पण धंगेकर आणि रासने यांच्याच प्रचाराची जोरदार चर्चा होती. विशेष म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये धंगेकर यांच्या प्रचाराचा वाढलेला जोर भाजपच्या पराभवाचे संकेत देणारा होता.

Politics Kasba By Poll Election BJP Defeat Analysis


Previous Post

रामदास आठवलेंचा जलवा! महाराष्ट्रात एकही आमदार नाही… नागालँडमध्ये निवडून आले २ आमदार…

Next Post

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष – वकील हरीश साळवेंच्या सरप्राईज एन्ट्रीने वाढवले ठाकरे गटाचे टेन्शन; आज सुनावणीत काय झालं?

Next Post

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष - वकील हरीश साळवेंच्या सरप्राईज एन्ट्रीने वाढवले ठाकरे गटाचे टेन्शन; आज सुनावणीत काय झालं?

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group