बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर? चर्चांना उधाण

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2022 | 2:14 pm
in संमिश्र वार्ता
0
Dr amol kolhe

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केलं आहे. यावर अमोल कोल्हे यांनी वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचे हे आम्ही ठरवत असतो, असं म्हणलं आहे. कोल्हे यांच्या अशा सूचक विधानामुळे ते भाजपमध्ये जाणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.

डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. यापूर्वी ते शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले. त्यामुळेच ते सध्या विद्यमान खासदार आहेत. आणि आता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आढळराव पाटीलच काय अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे, असं विधान केलं होतं. त्यावर अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया दिली असून, राजकीयदृष्ट्या त्यांच्या विधानात काही गैर नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपने आतापासूनच शिरूर मतदारसंघात सुरू केलेले दौरे सुरु केले असल्याने या चर्चेला जोर मिळाला आहे.

पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्याऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक विधान करून एकप्रकारे बळ देण्याचं काम केल्याने कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. भाजपाला आपली सत्ता टिकविण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसणं यात राजकीयदृष्ट्या चुकीचं नाही. २०१४ मध्ये येथील मतदारांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला शिरूर लोकसभेतून मोठ्या विश्वासाने संसदेत पाठविले. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली. मतदारांचा विश्वास असाच टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.

मी लोककल्याणाचा प्रयत्न करणार..

निवडणुका अद्याप खूप लांब आहेत. आताच पक्षांतर, नाराजी आदी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आकारण त्याविषयी काहीतरी बातम्या पेरत राहणं किंवा त्याविषयी चर्चा करणं मला अनाठायी वाटतं. निवडणूक हे माध्यम आहे, तर सत्ता हे साधन आहे. आपल्या मतदारांचा विश्वास सार्थ ठेवण्याचं. विकासाची वाट धरून लोक कल्याणाची कामे करण्याचं. तोच प्रयत्न मी करत राहणार आहे, असंही कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

Politics NCP MP Dr Amol Kolhe BJP

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने नाशिकमध्ये मोर्चा

Next Post

येवला तालुक्यातील या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन; राज्य सरकारची मान्यता

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

येवला तालुक्यातील या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन; राज्य सरकारची मान्यता

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011