ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रवेश सोहळा ठाण्यामध्ये संपन्न झाला. यावेळी नाशिकचे पालंकमंत्री दादा भुसे आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊ चौधरी हे उपस्थित होते. या दोघांच्याच पुढाकाराने हे नेते शिंदे गटात आले आहेत.
शिंदे गटाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच अन्य पक्षांतील २० ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये उबाठा गटाचे माजी तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, इंदुमती संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवृत्ती घुले, छावा संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता आबा गांगुर्डे, युवासेना तालुका प्रमुख रोहित ठाकरे, उत्तम मापारी, बाळासाहेब झालटे, दिगंबर चव्हाण, संदीप चव्हाण यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा सचिव भाऊ चौधरी तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच अन्य पक्षांतील २० ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काल #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यासमयी उबाठा गटाचे माजी तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, इंदुमती संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती… pic.twitter.com/5mLkucOFzU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 25, 2023
Politics Nashik District Leaders Join Shinde Sena