India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर… यंदाही मुलींचीच बाजी… हा विभाग सर्वप्रथम

India Darpan by India Darpan
May 25, 2023
in मुख्य बातमी
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा निकाल ९१.३५ टक्के लागला आहे. आज दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत आज हा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, मुलांचे प्रमाण ८९.१४ टक्के एवढे आहे. राज्यात एकूण १४,१६,३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२,९२,४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दृष्टीक्षेपात निकाल असा
मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.७३
मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.१४
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर) निकालाची टक्केवारी ४४.३३ टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी  ८२.३९ टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी  ९३.४३ टक्के

विभागनिहाय निकाल असा
कोकण : ९६.०१
पुणे : ९३.३४
कोल्हापूर : ९३.२८
अमरावती : ९२.७५
औरंगाबाद : ९१.८५
नाशिक : ९१.६६
लातूर : ९०.३७
नागपूर : ९०.३५
मुंबई : ८८.१३

दुपारी २ वाजता निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल आज दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

खालील वेबसाईटवर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.

यासाठीच्या सविस्तर सूचनांसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देता येईल. या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजना उपलब्ध राहील. या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत वितरित करण्यात येतील. इयत्ता १२ वी परीक्षेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व राज्य मंडळातील तसेच सर्व विभागीय मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले आहे.

Maharashtra HSC Board Exam Result Declared


Previous Post

मुंबईत लव्ह जिहाद? पीडितेच्या वडिलांनीच सांगितला तो सर्व प्रकार

Next Post

नाशिक जिल्ह्यातील या नेत्यांचा शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

Next Post

नाशिक जिल्ह्यातील या नेत्यांचा शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group