नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सत्ता संघर्षातील अत्यंत कळीचा मुद्दा ठरला आहे तो शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे चेंडू टोलवला आहे. आता अध्यक्षांना यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. ते काय निकाल देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांच्या घटना मागवणार आहेत. तसेच, या घटना आणि त्यातील विविध तरतुदी यांची तपासणी अध्यक्ष नार्वेकर करणार असल्याचे समजते. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांकडे आल्यापासून त्यांच्याकडून घडामोडींना वेग येत आहे. नार्वेकर हे वकील असून त्यांच्याकडून निष्पक्ष आणि मोठा निकाल अपेक्षित असल्याचे बोलले जाते.
आता या सर्व प्रकरणात तत्कालिन विधानसभा प्रभारी अध्यक्ष आणि आताचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. झिरवाळ म्हणाले की, अध्यक्ष नार्वेकरांकडे तापसण्या पालिकडे काहीही नाही. निकाल ठरलेला आहे, सर्व बाबी १६ आमदारांच्या विरोधात आहेत. फक्त एकच बाब अध्यक्षांकडे आहे ती म्हणजे तपासणी करायची, असे सांगत झिरवाळ यांनी एकप्रकारे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
बघा, झिरवाळ यांची सविस्तर प्रतिक्रीया
Politics Narhari Zirwal on 16 MLA Disqualification