India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नागपुरातील मआविची वज्रमुठ सभा अडचणीत? फडणवीस-गडकरींच्या बालेकिल्ल्यात नियोजनाचा फज्जा…

India Darpan by India Darpan
April 13, 2023
in राष्ट्रीय
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा नागपुरात होणार आहे. या सभेच्या स्थळावरून आधीपासूनच गोंधळ सुरू झाला आहे. १६ एप्रिलला ज्या ठिकाणी ही सभा घेण्याचे मविआने ठरविले आहे, त्या ठिकाणावरून पूर्वी फक्त स्थानिकांच्या विरोधाचीच अडचण होती. मात्र आता १२ हजार क्षमता असलेल्या मैदानावर लाखाची गर्दी कशी येणार, या प्रश्नाने स्वतः महाविकास आघाडीच टेंशनमध्ये आहे.

१६ एप्रिलला पूर्व नागपुरात दर्शन कॉलनी येथील सद्भावना नगर मैदानावर ही सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने परवानगी दिली असून आवश्यक शुल्कही भरण्यात आले आहे. मात्र स्थानिकांनी मैदानाचे नुकसान होण्याच्या कारणाने सभेला विरोध दर्शवला. हा विरोध दर्शविण्यासाठी स्थानिकांनी मैदानावर आंदोलनही केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मैदानावर क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

मैदानाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आता याठिकाणी सभा घेतली तर खेळाडूंचे व मैदानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा रद्द करावी अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा कृष्णा खोपडे यांनी दिला. हा विरोध झुगारून महाविकास आघाडीने सभेच्या प्रचारासाठी रथ फिरवायला सुरुवात केली आहे. मात्र आता एक नवीनच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आणि तो आहे गर्दीचा.

वज्रमुठ सभेला एक लाख लोकांची गर्दी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपेक्षित आहे. पण या मैदानावरील स्टेजचा आणि सुरक्षा सर्कलचा भाग सोडला तर मोजून १२ हजार खुर्च्या मैदानावर मावतात. यात आणखी कशीबशी भर घातली तर १५ हजार होतील. मुळात लाखाच्या गर्दीच्या अपेक्षेने होणारी सभा अवघ्या बारा-पंधरा हजार लोकांवर कशी आटोपती घ्यायची, असा प्रश्न आता मविआच्या नेत्यांपुढे आहे.

फडणवीसांच्या गावात सभा
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टारगेटवर केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार असले तरीही दुसरी सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावात होत आहे. त्यामुळे नेत्यांच्या टारगेटवर फडणवीस असतील, यात वाद नाही. अशावेळी सभा यशस्वी करून दाखविण्यासाठी लाखोंची गर्दी जमवण्याचे आव्हान नेत्यांपुढे होते. पण आता मैदानाची क्षमता बघता फार तर पंधरा हजारांमध्ये समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.

#वज्रमूठ
महाविकास आघाडीची
विराट जाहीर सभा
स्थळ : दर्शन कॉलनी मैदान, KDK कॉलेज समोर, नंदनवन, नागपूर रविवार, 16 एप्रिल 2023 | सायं. 5 वा. pic.twitter.com/GekHF9MKYa

— Yuvraj (Nilesh) Deshbhratar (@Nil_deshbhratar) April 11, 2023

Politics MVA Nagpur Vajramuth Sabha Planning Failure


Previous Post

ऐतिहासिक! मेट्रो धावली चक्क गंगा नदी खालून; ही आहे देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो

Next Post

गेल्या ८० वर्षात पाहिली नाही अशी गारपीट… आभाळच फाटलं… शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी… शेतपिकांची दाणादाण…

Next Post

गेल्या ८० वर्षात पाहिली नाही अशी गारपीट... आभाळच फाटलं... शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी... शेतपिकांची दाणादाण...

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group