नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरुद्ध येथील पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी तक्रार दिली. त्याची दखल घेत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1627238749519380482?s=20
Politics MP Sanjay Raut Nashik FIR Booked