मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत. राऊतांनी विधीमंडळाला थेट चोर मंडळ म्हटल्याने आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडत राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. राऊतांवर थेट हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. आता या प्रकरणी दोन दिवसात निर्णय दिला जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. राऊत यांनी विधानसभेच्या सदस्यांना ‘चोर’ संबोधल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी राऊत यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी कथितपणे “विधिमंडळ” हे “चोरमंडळ” असल्याचे म्हटले आहे.
➡️ खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची सत्ताधारी पक्षाची मागणी.
➡️राऊतांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आक्रमक. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ #विधानसभा #mahabudgetsession2023 #maharashtrabudget @ShelarAshish @BhatkhalkarA @DDNewslive pic.twitter.com/m6ox4e9Ioz— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 1, 2023
संजय राऊत यांच्या कथित वक्तव्याचा मुद्दा भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. आमदारांना चोर म्हटले जात असून हा राज्याचा अपमान असल्याचे ते म्हणाले. भाजपचे आणखी एक आमदार अतुल भातखळकर यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी राज्यसभा सदस्य राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली असून ती स्वीकारण्याची विनंती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. ती अध्यक्षांनी स्विकारली.
राऊत यांच्या वक्तव्याविरोधात केवळ भाजपच नाही तर त्यांच्या मित्रपक्षांचे सदस्यही उभे ठाकले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही अशी टिप्पणी करणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे ठाकरे गटाचे मित्रपक्ष आहेत. थोरात म्हणाले की, ‘नक्की काय बोलले ते तपासण्याची गरज आहे. तसेच, सभागृहात काय बोलले जाते याची काळजी घेतली पाहिजे. आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अध्यक्षांनीही याकडे लक्ष द्यावे.
संजय राऊत यांच्या वक्तव्यानं विधिमंडळाचं तसंच सर्वच लोकप्रतिनिधींचा आणि राज्यातल्या जनतेचा अपमान झाला,विधिमंडळाचा चोर असा उल्लेख करणं योग्य नाही – उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ #विधानसभा#mahabudgetsession2023 #Maharashtra #sanjayRaut @DDNewslive pic.twitter.com/u8xBz99nba
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 1, 2023
Politics MP Sanjay Raut in Trouble Assembly Session Speaker Order