शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘खडसे राष्ट्रवादी संपवताय, त्यांची आमदारकी परत घ्या’, मंत्री गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी

डिसेंबर 13, 2022 | 12:42 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Gulabrao Patil Eknath Khadse

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे पाच उमेदवार विजयी झाले यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या विरोधात चांगलाच टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे खच्चीकरण केले असल्याने निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यांची आमदारकी आता परत घ्यायला पाहिजे कारण, त्यांनी राष्ट्रवादी संपवायला काढली आहे, असेही ते म्हणाले.

जळगाव दूध संघाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटानं एकनाथ खडसे गटाचा पराभव करत जळगाव जिल्हा दूध संघाची सत्ता काबीज केली आहे. २० पैकी १६ जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत. तर ४ जागांवर एकनाथ खडसे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर टिका केली.

“सहकाराची निवडणूक ही थेट पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी पक्षाच्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांनी राहायला हवं अशी अपेक्षा असते. किमान विरोधी पक्षाच्या गोटातून तरी त्यांनी निवडणूक लढवायला नको असं मानल जात होते. मात्र, खडसे यांचे अगदी निकटवर्तीय असलेल्या पाच उमेदवारांनी गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनल कडून उभे राहून खडसे यांच्या सहकार पॅनल विरोधात विजय मिळवला आहे. त्यामुळं खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली असल्याचं आता विरोधक तोंडावर बोलत आहेत. या निवडणुकीत निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली असल्यानं तुमची आमदारकी परत घ्यायला पाहिजे”, अशा प्रकारची खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी लढवली खडसेंविरोधात निवडणूक
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार दिलीप वाघ, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, प्रदीप निकम, शामल झाम्रे, मधुकर राणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी ऐनवेळी खडसे यांच्या महाविकास आघाडीला राम राम केला. हे सर्वजन गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलला जाऊन मिळाले. त्यामुळे शेवटच्या क्षणी खडसे यांना धक्का बसला.

खडसेंच्या पॅनलमध्ये अटी असल्याने पॅनल बदलले – संजय पवार
दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी नेहमीच शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत आहे. मात्र, खडसेंच्या पॅनलमध्ये मला काही अटी शर्थी घालण्यात आल्या होत्या. त्या मला पटणाऱ्या नसल्यानं मी सर्वपक्षीय पॅनल असलेल्या गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलमध्ये राहिलो आहे. सहकारमध्ये पक्षीय राजकारण नसते. मागील काळात सहकाराच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक नेते हे इतरांसोबत गेले आहेत. ते यांना चालले होते. मग आताच न चालण्यासारखं काय आहे, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

Politics Jalgaon Gulabrao Patil on Eknath Khadse Critic
District Milk Society

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत-चीन सीमेवर नेमकं काय घडलं? संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिली ही माहिती (बघा व्हिडिओ)

Next Post

शिंदेंच्या दोन गटातच तुफान हाणामारी; पोलिसांनी वेळीच घेतली धाव… अखेर गुन्हे दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
crime diary

शिंदेंच्या दोन गटातच तुफान हाणामारी; पोलिसांनी वेळीच घेतली धाव... अखेर गुन्हे दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011