बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खडसे अनभिज्ञ! गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांमध्ये गुप्त बैठका सुरू

नोव्हेंबर 13, 2022 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
girish mahajan eknath khadse

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणतीही निवडणूक म्हटले की त्यात राजकारणाचे डावपेच आलेच, सध्या जळगाव जिल्ह्यात एकच निवडणूक गाजत आहे ती म्हणजे जिल्हा दूध संघाची होय सध्या जिल्हा दूध संघावर एकनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असून त्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा गट तसेच भाजप यांनी डावपेच आणण्यास सुरुवात केली आहे.

एकनाथ खडसे यांना एकाकी पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे. जळगावमध्ये सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत खडसेंना एकाकी पाडून शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे. यात आणखी विशेष म्हणजे खडसेंना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याचे समजते.

जळगाव जिल्हा दूध संघात सुमारे सव्वा कोटीचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात विलंबाने गुन्हा दाखल केला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले असून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने एकनाथ खडसे यांना झटका देण्यासाठी जळगाव जिल्हा दूध संघातील समिती बरखास्त केली होती. या समितीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले होते. याच आरोपांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित समिती बरखास्त केली.

आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत मिळून एकनाथ खडसे यांना एकटं पाडण्यासाठी नियोजन करत आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांना सोडून राष्ट्रवादीसह इतर पक्षांना भाजप-शिंदे गटाच्या सोबत घेऊन सर्वपक्षीय पॅनल स्थापन करण्याचा गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचा प्रयत्न आहे.

इतकेच नव्हे तर गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गुप्त बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची उपस्थिती होती. खडसेंच्या या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आता भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गिरीश महाजन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधकच नव्हे तर राजकीय वैरी मानल्या जातात, त्यांना आता गुलाबराव पाटील यांची साथ लाभली आहे. त्यामुळे खडसे यांचे वर्चस्व जिल्हा दूध संघावरून निश्चितच हटणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.

Politics Jalgaon Girish Mahajan Gulabrao Patil Secret Meet
BJP Shivsena NCP

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टाटांचा धमाका! आणली ही जबरदस्त CNG कार; अन्य कंपन्यांचे टेन्शन वाढले

Next Post

संभाजी भिडे पुन्हा वादात; विचारांशीच घेतली फारकत? खरं काय आहे?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
sambhaji bhide

संभाजी भिडे पुन्हा वादात; विचारांशीच घेतली फारकत? खरं काय आहे?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011